'

श्रीरामपूर: शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू - BatmiExpress.com

0

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू - BatmiExpress.com

श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव जवळ असणाऱ्या कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कान्हेगाव येथे सकाळी काही लहान मुले तलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी गेले होते. यापैकी चैतन्य अनिल माळी (वय १२), दत्ता अनिल माळी (वय ८) व चैतन्य शाम बर्डे (वय ४)  ही तीन लहान मुले खेळताखेळता कान्हेगाव येथील शेतकऱ्याच्या शेततळ्याजवळ गेली. 

हेही वाचा: बापरे... शेतात जात असणाऱ्या महिलेची वाट रोखुन मारहाण 

पावसाचे पाणी या तळ्यात साचलेले होते. या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही व तिघेही पाण्यात बुडून मयत झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी गोळा झाले. 

तिन्ही मुलांचे शव बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. मृत पावलेली तिन्ही लहान मुले गरीब कुटुंबातील आहेत.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×