परभणी हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेची आत्महत्या - BatmiExpress.com

परभणी हादरली,अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेची आत्महत्या,अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार,Rape News,Parbhani shuddered!

परभणी हादरली,अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेची आत्महत्या,अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार,Rape News,Parbhani shuddered!
परभणी हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेची आत्महत्या

परभणी हादरली! :- परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर 3 जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोनपेठ तालुक्यातील 16 वर्षीय मुलीला त्याच परिसरातील तीन मुले त्रास देत होती. त्यातच 12 सप्टेंबर रोजी या नराधम तरुणांनी पीडित मुलीला तालुक्यातील डिघोळ तांडा परिसरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला लातूरला हलवण्याचा सल्ला दिला. 

हेही वाचा: 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 3 जणांवर गुन्हा दाखल

मात्र पीडित मुलीचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच सोनपेठ पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी परळी परिसरातून आज पोलिसांनी अटक केला आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असून या प्रकरणात पीडितेने तिच्यावर अत्याचार झाल्याचं स्टेटमेंट दिलं आहे.  

 दरम्यान, सामूहिक बलात्कार आणि नंतर झालेल्या मुलीच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.