आमची किडनी घ्या; मात्र रस्ते चांगले करा! - BatmiExpress.com

आमची किडनी घ्या; मात्र रस्ते चांगले करा! ,Marathi News,News in Marathi,Jalgaon News

आमची किडनी घ्या; मात्र रस्ते चांगले करा! ,Marathi News,News in Marathi,Jalgaon News
आमची किडनी घ्या; मात्र रस्ते चांगले करा! 

जळगाव शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, मनपाकडून आर्थिक परिस्थितीचे कारण देत शहरातील रस्त्यांची कामे देखील थांबली आहेत. त्यामुळे वैतागलेल्या जळगावकरांनी मनपा प्रशासनाला आपली किडनी घेऊन, ती विक्री करून मिळालेल्या रकमेतून शहरातील रस्ते तयार करण्याचे साकडे घातले आहे. 

कर भरूनदेखील जळगावकराना सुविधा मिळत नसतील तर करासोबत किडनी देखील घ्या; मात्र शहरातील रस्ते करा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. सोमवारी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिकांनी मिळून मनपा प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले आहे.

हेही वाचा: परभणी हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेची आत्महत्या

दुसरा पर्यायच नाही : चोपडा, पाचोरासारख्या नगरपालिकांच्या हद्दीत चांगले रस्ते असताना, महापालिकेच्या हद्दीत चांगले रस्ते मिळत नसल्याने आता नागरिकांना चांगल्या रस्त्यांसाठी किडनी देण्याशिवाय पर्याय नसल्याचे गुप्ता यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.