Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडले, गोसीखुर्दमधून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग - BatmiExpress.com

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडले,(21doors of gosikhurd dam open due to heavy rain,gosikhurd dam,Goshikhurd,Goshikhurd live,

 

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडले,(21doors of gosikhurd dam open due to heavy rain,gosikhurd dam,Goshikhurd,Goshikhurd live,
Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द धरणाचे 33दरवाजे उघडले

Gosikhurd Flood Live: राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये (gosikhurd dam) सतत पाऊस पडत असल्याने असल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 21 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन 2546 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन  सुरू असलेला विसर्ग पुन्हा वाढविण्यात येणार आहे.  (21 doors of gosikhurd dam open due to heavy rain)  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे येवा वाढत असल्याने सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 5000 क्युमेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

गोसीखुर्द धरणातुन सध्या 2546 क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन  सुरू असलेला विसर्ग आज सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 5000 क्युमेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार आहे.. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी असे सुचित करण्यात येत आहे.

चिचडोह बॅरेज चे ( Chichdoh Barrage )38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 2683 क्युमेक्स आहे. 
#नदीची पाणी पातळी पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.  Chichdoh Barrage ) इटियाडोह प्रकल्प - 71.82% / कालवा- बंद / वेस्ट वेअर ओवरफ्लो- निरंक

2. वर्धा नदी:
निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 19 गेट उघडलेले असुन विसर्ग 541 क्युमेक्स आहे.  बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. 

3. प्राणहिता नदी:
दिना प्रकल्प – 91.74% / कालवा- बंद / वेस्ट वेअर ओवरफ्लो- निरंक 
प्राणहिता नदीची पाणी पातळी  महागांव व टेकरा सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.

4. गोदावरी नदी:
लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 24 गेट उघडलेले असुन विसर्ग 3420 क्युमेक्स (1,20,780 क्युसेक्स) आहे. 
गोदावरी नदी काठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.
गोदावरी नदीची पाणी पातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे. 

5. इंद्रावती नदी:
इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे. 
पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील सकाळी 8.30 वाजताच्या  नोंदीनुसार पूलाच्या 2.95 मी. ने खाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.