सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
सिंदेवाही:- तालुक्यातील खांडला येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना दिनांक 19 सप्टेंबर 2021 रविवार रोज दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सप्टेंबर २०, २०२१
0
मृतकाचे नाव अनिल सोनुले (वय ३६ ) असे आहे. खांडला गाव परिसरातील पळसगाव ( पिपर्डा) बफर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात शेतकरी अनिल सोनुले स्वतःचे जनावरे चराईला घेऊन गेले असता जवळच दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. #Tigerattack
सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले व मौका पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.