Shikshak Bharti 2021: राज्यात शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा - बातमी एक्सप्रेस

Shikshak Bharti 2021,राज्यात शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा ,Teacher Recruitment,Teacher Recruitment 2021,Teacher Recruitment News
Shikshak Bharti 2021,राज्यात शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा ,Teacher Recruitment,Teacher Recruitment 2021,Teacher Recruitment News
Shikshak Bharti 2021:  राज्यात शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा 

Shikshak Bharti 2021:
राज्याच्या शिक्षण विभागात एकूण 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या एकूण अर्जांमधून 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  (Education Minister Varsha Gaikwad)  यांनी दिली आहे. 
“पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!” दरम्यान, राज्यात एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार यांचा समावेश आहे.  शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.