26 वर्षीय युवकाने केली 42 वर्षीय इसमाची हत्या
गडचिरोली:- क्षुल्लक वादातून 26 वर्षीय युवकाने एका 42 वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. इंद्रजित गोविंद नमो (42 ) रा.खुदीरामपल्ली, ता. मुलचेरा, जिल्हा गडचिरोली असे मृतक इसमाचे नाव आहे. हेही वाचा: गोसीखुर्द: 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय : ना. विजय वडेट्टीवार
सप्टेंबर २९, २०२१
0
प्राप्त माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी खुदीरामपल्ली येथील मुख्य चौकात किशोर चक्रवर्ती यांच्या दुकानात मृतक इंद्रजित नमो आणि हत्या करणारा युवक अभिजित प्रसन्नजीत माळी या दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाऊन अभिजित माळी या 26 वर्षीय युवकाने इंद्रजित नमो यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात इंद्रजित नमो याच्या गालावर (कानाखाली) जबर मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.ही घटना सोमवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान घडली. उशीर झाल्याने त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले नाही. मंगळवारी त्याच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून मुलचेरा चे ठाणेदार प्रशांत जुमडे पुढील तपास करीत आहेत.हत्या करणारा आणि मृतक इसम हे दोघेजण एकाच ठेकेदारकडे पेंटिंगचे व पीओपीचे काम करत होते.
काही दिवसांपूर्वी मृतक इंद्रजित नमो याला कामावरून काढण्यात आल्याने या दोघांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.यापूर्वी सुद्धा या दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती मृतकाचे भाऊ सूर्यकांत नमो यांनी दिली आहे. नेमका वाद कशामुळे झाला हे पोलिसांच्या चौकशी नंतरच कळणार असले तरी या हत्येमुळे मुलचेरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.