यवतमाळ बस दुर्घटना
Yavatmal bus accident: यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथून काही अंतरावर असलेल्या दहागाव येथे काल पुराच्या पाण्यात बस वाहून गेली होती. या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या बस चालकाचा मृतदेह दहागावच्या वीस किमी अंतरावर सापडला. या दुर्घटनेत एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतकांना शासनाने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
हेही वाचा: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने बलात्कार तर 11 वर्षीय मुलावर अत्याचार
मृतकामध्ये चालक सतीश रंगप्पा सुरेवार (वय 53) रा.नागपूर, वाहक भीमराव लक्ष्मणराव नागरिकर (वय 56), प्रवाशी शेख अलीम शेख इब्राहिम, इंदल रामप्रसाद मेहंद्रे दोघेही रा.पुसद जिल्हा यवतमाळ यांचा सामावेश आहे.