टेंभुर्णी गावांमध्ये पुराचे पाणीच पाणी
Hingoli News: वसमत तालुक्यातील टेंभुर्णी गावांमध्ये गावालगत असलेल्या ओढ्याचे पाणी शिरले आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.
हेही वाचा: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने बलात्कार तर 11 वर्षीय मुलावर अत्याचार
टेंभुर्णी गावाशेजारी असलेला ओढा तुडुंब भरून वाहत असल्याने ओढ्याचे पाणी थेट गावात शिरले. पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने गावाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या पाण्यामुळे अनेकांचे संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजले आहे. प्रशासनाने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.