सिलिंडरच्या स्फोटात घर उध्वस्त
Bhandara News: लाखनी तालुक्यातील गुरढा येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार अंकुश आत्राम यांच्या घरी सकाळच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सदर घटनेच्या वेळी घरातील सर्व मंडळी घराबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला. झालेल्या घटनेत घरातील अन्नधान्य, कपडे, कपाट, यांच्यासह जीवनावश्यक वस्तू जवळपास जळून खाक झाल्या.
सदर घटनेची माहिती तालुका प्रशासनाला मिळतात नायब तहसीलदार, स्थानिक सरपंच आदींनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. अंकुश आत्राम यांचे घर कौलारू होते, सिलिंडरच्या स्फोटात घर पुर्णतः उध्वस्त झालेले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.