Chandrapur Accident News: भावची भेट बहिणीसाठी ठरली शेवटची
Chandrapur Accident News:- भावाला भेटून सावली येथे आपल्या गावी जात असलेल्या एका महिलेला बल्लारशाह बायपास रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लीलाबाई रामचंद्र घडसे, सावली असे मृत महिलेचे नाव आहे.
सप्टेंबर २२, २०२१
0
लीलाबाई बाबूपेठ परिसरातील रहिवासी असलेले भाऊ क्रांतीलाल रायपुरे यांना भेटण्यासाठी आली होती. भेट झाल्यानंतर ती सावली येथे जाण्यासाठी निघाली. दरम्यान, बल्लारशा बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली.
हेही वाचा: पहिल्यांदाच गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे एक मिटरने उघडले, गोसीखुर्दमधून 7293 क्युसेक पाण्याचा विसर्ग
दरम्यान, आपच्या कार्यकर्त्यांनी महिलेला आर्थिक मदत तसेच अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्याची मागणी केली. पोलिसांनी २४ तासात आरोपींचा शोध घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांसह आपचे कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.