'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur Crime News: गोंडपिपरी तालुक्यात 12 वर्षीय बलिकेचा विनयभंग; आरोपी ताब्यात - BatmiExpress.com

0

Chandrapur Crime News,Rape News,Marathi News, News,Latest News in Marathi,Chandrapur News,गोंडपिपरी तालुक्यात १२ वर्षीय बलिकेचा विनयभंग,
Chandrapur Crime News: गोंडपिपरी तालुक्यात 12 वर्षीय बलिकेचा विनयभंग

गोंडपिपरी:- घरात एकटी असलेल्या बारा वर्षीय बलिकेचा विनयभंग करणाऱ्या चाळीस वर्षीय विवाहित पुरुषाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली. आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडा येथिल सुधाकर अवथरे ( वय 40 ) असे आरोपीचे नाव आहे. ( 12-year-old girl raped in Gondpipri taluka )

पोलीस सूत्रानी दिलेल्या माहीतीनुसार, मंगळवारला दुपारी एक वाजताचा सुमारास सदर बलिकेचा विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न अवथरे याने केला. व्यक्तीगत कामानिमित्त पिडीतेचे आई- वडील बाहेर गावी गेले होते. पिडीतेला घरात एकटे बघून आरोपीने विनयभंग केला. घडलेला प्रकार पिडीतेने कुटूंबियांना सांगितला. वडिलांनी गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठले. अन् तक्रार दाखल केली.


ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय.धर्मराज पटले यांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. मुल येथील पॉस्को पथकाचे प्रमुख रामटेके मॅडम या प्रकरणी तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×