वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले; 3 मृत्यू आणि इतरांचा शोध सुरू - BatmiExpress.com

वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले,boat capsized in the Wardha river and 11 drowned,वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले; 3 मृत्यू आणि इतरांचा शोध सुरू

वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले,boat capsized in the Wardha river and 11 drowned,वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले; 3 मृत्यू आणि इतरांचा शोध सुरू
वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले

वरुड ( जि. अमरावती) :
-जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली असून अद्याप ३ मृतदेह मिळाले आहेत. ( B
oat capsized in the Wardha river and 11 drowned )

हेही वाचा:

प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. काल दशक्रियेचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर आज सकाळी वरुडकडे फिरायला गेले. सर्वजण वर्धा नदीतून नावेने जात होते. मात्र, नियतीच्या मनात काय होते कोणास ठावूक. अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वजण असल्याची प्राथमिक माहिती आहे. अद्यापही तिघांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.