Chandrapur Accident News: भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पोंभूर्णा:- आक्सापूर -पोंभूर्णा मार्गावरील बोरीच्या नाल्याजवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एका तरूणाचा मृत्यू झाला ( Chandrapur Accident News ) असून एक जखमी झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना १२ सप्टेंबरला संध्याकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. रोहित रविंद्र भांडेकर वय २२ वर्ष (रा.गडचिरोली ) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान सहा- सात मित्र पोलिस भरतीच्या सरावासाठी चिंतलधाबा रोडकडे गेले होते. सराव करून परतत असताना चिंतलधाब्याकडून पोंभूर्ण्याकडे भरधाव येणाऱ्या (MH 34-AW 3271) या दुचाकीने स्वामी विवेकानंद पब्लीक स्कुल जवळील बोरीच्या नाल्याजवळ पैदल येणाऱ्या तरूणांना जबर धडक दिली. यात रोहित भांडेकर या २२ वर्षीय तरूणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र शेषराव ढोले यालाही जबर मार लागला आहे. यातील भरधाव दुचाकीस्वार चालक नरेंद्र कोमलवार याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला तात्काळ चंद्रपूर च्या खाजगी मेहरा हास्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले. त्यांचेवर वैद्यकीय उपचार सुरू आहे.
हेही वाचा:
- चंद्रपूर शहराच्या एका हनुमान मंदिराच्या मागे नग्नावस्थेत विवाहित महिला व युवक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली
- चंद्रपूर हादरला! 'प्यार तूने क्या किया', एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीवर चाकूनं सपासप वार; प्रेम केलं तिलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं