
प्रेम केलं तिलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं
Crime in Chandrapur: ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून (One sided love) एका तरुणीवर चाकूनं सपासप वार (Attack with knife) केले आहेत. आरोपीनं भररस्त्यात हे धक्कादायक कृत्य केलं आहे. यानंतर आसपासच्या लोकांनी रक्तबंबाळ झालेल्या तरुणीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पीडित मुलीचे अवस्था पाहून डॉक्टरही हैराण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
चंद्रपूर हादरला! 'प्यार तूने क्या किया', एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीवर चाकूनं सपासप वार; प्रेम केलं तिलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं - BatmiExpress.com
सप्टेंबर १२, २०२१
0
अन्य ॲप्सवर शेअर करा


कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.