![]() |
नवजात अर्भकाला फेकले सार्वजनिक विहिरीत |
कुरखेडा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या वाकडी येथे एका अज्ञात इसमाने नवजात अर्भकाला गावातील सार्वजनिक विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना आज ६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्याने संपूर्ण गावात नवजात अर्भकाविषयी मोठी खळबळ माजली आहे. (Newborns thrown into public wells)
सविस्तर वृत्तांत असे की, पहाटे सकाळच्या सुमारास गावातील लहान मुले खेळत असतांना सार्वजनिक विहिरीच्या आतमध्ये टोंगुण पाहिले असता त्यांना विहिरीतील पाण्यामध्ये काहीतरी तरंगत असतांना दिसले. दिसताक्षणी याची माहिती आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांना देण्यात आली व सदर प्रकरण उघडकीस आले.लगेच गावातील पोलीस पाटील यांना सदर घटनेची माहिती होताच कुरखेडा पोलीस विभागाला कळविण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.