देसाईगंज: आदर्श कनिस्ट महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के | बातमी एक्सप्रेस

आदर्श कनिस्ट महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के,wadsa,Desaiganj,Gadchiroli,Gadchiroli Live News,Wadsa News,Desaiganj News,Marathi News,वडसा,देसाईगंज

आदर्श कनिस्ट महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के

देसाईगंज
: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माद्यामिक शिक्षण मंडळाने अंतर्गत गुणांच्या आधारे 3 आगस्टला 12वी परीक्षेचा निकाल घोषित केला. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 12वीचा निकाल भरपूर प्रमाणात लागलं आहे. यामध्ये देसाईगंज तालुक्यातील आदर्श कनिस्ट महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. याबद्दल महाविद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. 

यात विज्ञान शाखेतून कहफुलवरा शाकीर शेख 87 टक्के गुण घेऊन प्रथम, डिंपल मनोहर नेबारे 80 टक्के गुण घेऊन द्वितीय, सेजल अशोक लाडे 78.83 टक्के गुण घेऊन तृतीय आली. कला शाखेतून प्रियंका शामकुवर ठाकरे 82.83, तेजस्विनी बेदाराम थाट 82.83 टक्के गुणासह संयुक्तपणे प्रथम, गायत्री राजू नागमोती 81.5 टक्के गुणासह द्वितीय, लिना गणेश झिलपे 80.33 टक्के गुणासह तृतीय आली, वाणिज्य विभाग कुंदन किशोर दुपारे 85, हीना सुरेंद्र राऊत 85 टक्के गुणास संयुक्तपणे प्रथम, रेवनाथ राजेंद्र चटारे 83.66 टक्के गुणासह द्वितीय रुतूजा तेजस्वी नाकतोडे 83.17 टक्के गुणासह तृतीय आली आहे. संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: नेवजाबाई हितकारिणी (NH) महाविद्यालयाचा 12वी निकाल 100 टक्के

विद्यार्थ्यांच्या घवघवित यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष केवळराम घोरमोडे, सचिव मोतीलाल कुकरेजा, उपाध्यक्ष जगदीश शर्मा, कोषाध्यक्ष मुरलीधर दुपारे व सदस्या प्राचार्या सुलमा प्रधान, उपप्राचार्य प्रा.सदाराम ठाकरे, पर्यवेक्षक जयदेव नाकतोडे, प्रा. दामोधर शिंगाडे, प्रा. विलास सयाम, प्राध्यापक गण तथा सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.