![]() |
Narayan Rane Arrest: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक |
नाशिक - Narayan Rane Arrest: केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. ( Narayan Rane Arrest)
नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी नितेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.
दरम्यान आतापर्यंत दाखल गुन्हे रद्द करण्याच्या आणि अटकेपासून दिलासा देण्याच्या मागणीसाठी नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नोटीस न देताच अटकेच्या करवाईचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र कोर्टाने योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश वकिलाला देत तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.