Nagbhid: संजय गांधी योजना समितीचे आलेवाही येथे सभा संपन्न
Nagbhid: आज दिनांक 8 ऑगस्ट 2021 रविवार ला ग्रामपंचायत कार्यालय आलेवाही, ता. नागभीड येथे जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची सभा डॉक्टर रघुनाथ बोरकर, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा संजय गांधी योजनेचे सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.यावेळी अनेक लाभार्थ्यांनी आपल्या अडचणी अध्यक्षा समोर मांडल्या.
समितीने मंजूर केल्यानंतरही त्यांचे खाती पैसे जमा झाले नसल्याचे लक्षात आले तसेच एक विधवा महिला तर डिसेंबर 2020 ला तिची केस मंजूर झाली असताना सुद्धा केवळ बँकेच्या दिरंगाईमुळे त्या महिलेला महिलेला लाभ मिळू शकला नाही. तेव्हा अध्यक्ष डॉ. बोरकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, वाढोणा येथील बँक मॅनजरशी त्वरीत संपर्क साधून बँक पासबुक त्वरित देण्याबाबत सूचना देण्यात आली.त्याप्रमाणे मॅनेजर यांनी लगेच पासबुक देण्यात येईल असे सांगितले. अनेक प्रकारच्या अडचणी लाभार्थ्यांनी अध्यक्षा समोर ठेवल्या त्या सर्व अडचणी ऐकून त्या सोडवले जातील असे डॉ. बोरकर यांनी आश्वासित केले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.