'
30 seconds remaining
Skip Ad >

Nagbhid Accident News: नागभीडमध्ये मेटाँडोरच्या धडकेत आजी व नातीन ठार...! | बातमी एक्सप्रेस नागभीड

0

Nagbhid Accident News,Nagbhid News,Chandrapur News,Nagbhid Accident News: नागभीडमध्ये मेटाँडोरच्या धडकेत आजी व नातीन ठार...!
Nagbhid Accident News: नागभीडमध्ये मेटाँडोरच्या धडकेत आजी व नातीन ठार...!

Nagbhid Accident News: सध्या शाळा बंद असल्याने हार्दीका अमन मिसार रा.सुलेझरी नागभीड ही आपल्या भिकेश्वर येथील आजीकडे  दोन ते तीन दिवसांपूर्वी गेली होती... आजीला सकाळी फिरायला जायची रोजची सवय असल्याने आजी नेहमीप्रमाणे आजही पहाटे  फिरायला गेली.. मात्र फिरून आल्यांनातर नातनीला मला झोपवून ठेवून आजी फिरायला गेली हे लक्षात आल्यावर मला पण फिरवून आन असा तगादा आजीच्या मागे लावला.. नातनीचा हा हट्ट पूर्ण करण्यासाठी आजीने तिला सोबत घेत फिरायला नेले मात्र नियतीच्या पोटात काहीतरी वेगळे शिजलेले होते.... अचानक काहीच वेळात भरधाव वेगाने येणाऱ्या भाजीपाल्याच्या  आयशर मेटाडोर क्रं MH33/T 2470 चालकाचे नियंत्रण सुटले आणि चुकीच्या दिशेने गाडी नेत रस्त्यावरील चार ते पाच विद्युत पोल ला धडक देत या आजी-नातणीला धडक दिली...या घटनेत सुगंधा विश्वनाथ अनवले (वय 60) रा.भिकेश्वर  यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या हार्दिका अमन मिसार (वय 6) रा सुलेझरी हिला ग्रामीण रुग्णालय नागभीड इथे हलविले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला...सदर वाहनाचा  वाहनचालक घटनास्थळावरून पळुन गेला,,सदर प्रकरणी वाहन चालका विरुद्ध कलम 279,304(अ) भा द वि सहकलम 184,134/177 मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे...!!! ( Nagbhid Accident News)

हार्दीका ही सुगंधी अनवले यांच्या मुलीची मुलगी असून तिचे वडील रेल्वेत नौकरीला आहेत..सुगंधा अनवले यांच्या मागे मुलगा सून,मुलगी जावई व नातवंड असा बराच मोठा परिवार असून सदर घटनेने गावात शोककळा पसरली आहे..!!!

दरम्यान नागपूर ला भाजीपाला खरेदी साठी नेहमी रात्री ला अनेक गाडीचालक असतात व पहाटे भाजीपाला खरेदी करून भरधाव वेगाने आपल्या गावाकडे जात असतात यामुळे अनेकदा झोप न झाल्याने डुलकी आल्यामुळे किंवा नशेत वाहनचालकाचा वाहणावरून नियंत्रण सुटून अनेकदा या महामार्गावर अपघात झालेले आहेत...सदर घटनेचा तपास ठाणेदार  मडामे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे...!!!

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×