![]() |
चिमूर क्रांती दिनानिमित्त अभिवादन |
Chandrapur News: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, तेव्हा ऑगस्ट 1942 मध्ये चिमूर (जि. चंद्रपूर) आणि आष्टी (जि.वर्धा) ही गावे तीन दिवस स्वतंत्र होती. मात्र इंग्रजांनी दडपशाहीचा अवलंब केला आणि नागरिकांना घरात कोंबून ठेवले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी चिमूरमध्ये 16 ऑगस्ट 1942 रोजी 16 वर्षीय बालाजी रायपूरकर हा तरुण इंग्रजांना समोरा गेला व छातीवर गोळ्या झेलत शहीद झाला. या शहिदांच्या बलिदानाचा आणि त्यागाचा इतिहास नवीन पिढीला सांगणे गरजेचे आहे, असे मत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.