गोंडपिपरी तालुक्यात विज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यु
Chandrapur News: गोडपिपरी तालुक्यातील वेळगाव येथे शेतावर काम करीत असलेल्या दोन शेतकन्यांचा वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मारुती चौधरी (३५) व रेखा घुबड़े (३०) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा: Nagbhid Accident News: नागभीडमध्ये मेटाँडोरच्या धडकेत आजी व नातीन ठार...!
वेळगाव येथील रेखा घुबडे यांच्या शेतीवर रोजंदार म्हणून मारुती चौधरी हे कामावर गेले असता अचानक दुपारी विजेचा कडकडाट झाला. त्यावेळी शेतात रेखा घुबडे व मारोती चौधरी हे काम करीत होते. यात त्यांच्या दोघांच्या अंगावर बीज पडल्याने शेतातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत असताना पाऊस तर नाहीच मात्र आज दुपारी विजेच्या गर्जनेने वीज पडून दोन शेतकऱ्याचा बळी गेला.