ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा तोरगाव खुर्द येथे स्वतःच्या शेतामध्येमृतावस्थेत शेतकरी इसम आढळला असल्याची घटना घडली आहे. मृतक शेतकरी इसमाचे नाव नामदेव पंढरी साहारे वय 46 वर्षे असे असून तोरगाव खुर्द येथील रहिवासी आहे. ( Farmer Ism was found dead in a field in Bramhapuri taluka)
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की मृतक शेतकरी नामदेव गोसेखुर्द कालव्याचे पाणी करण्यासाठी शेतावर गेले होता. दोन दिवसापासून ते शेतीला पाणी करीत होते.बांधावरील खांडी पाहण्यासाठी काल दिनांक:-16/8/2021 अंदाजे 3:00 वाजे शेतावर गेले असता ते आपल्या शेतात मृत्युमुखी पडल्याचे शेतालगत असलेल्या शेतकऱ्याला दिसून आले असावे. मृत्यू होण्याचे मागचे कारण म्हणजे शेतातील बंदर हाकलता हाकलता झाडावरून किंवा पाय अडकून पडल्यामुळे किंवा विषारी साप किळा चावल्याने असावा असे गावापरिसरातील नागरिकामध्ये बोलले जात आहे.
त्यांच्या मृत्यूपश्चात दोन मुली एक मुलगा पत्नी व आई असा परिवार आहे.नामदेवच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळला असून गावापरिसरात शोकसागरात बुडालेला आहे.