'
30 seconds remaining
Skip Ad >

Tiger Attack: गडचिरोली जिल्ह्यातील अमिर्झा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार | बातमी एक्सप्रेस गडचिरोली

0

Tiger Attack: गडचिरोली जिल्ह्यातील अमिर्झा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार,Amirza,Gadchiroli,बातमी एक्सप्रेस गडचिरोली,Tiger Attack,Tiger Attack News
गडचिरोली जिल्ह्यातील अमिर्झा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

अमिर्झा
: येथून जवळच असलेल्या कळमटोला मार्गावरील भरडकर टोली शेतशिवारात वाघाच्या हल्ल्लात (Tiger Attack )  इसम ठार झाल्याची घटना आज १९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजाताच्या सुमारास उघडकीस आली. पुंडलिक मसाजी निकुरे वय अंदाजे ६५ वर्ष रा. भिकारमौशी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. सदर घटनेमुळे परिसात भितीचे वातावरण पसरले आहे. ( Ism was killed in a tiger attack at Amirza in Gadchiroli district )

प्राप्त माहितीनुसार, मृतक पुंडलिक निकुरे हे भरडकर टोली शेतशिवारात बैल चारण्याकरिता गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. शेतशिवारत असलेल्या इतर इसमांना मृतकाचे कपडे आढळून आल्याने त्यांनी शोधाशोध केली असता काही अंतरावर मृत शरीर आढळून आले व वाघाने ठार केले असल्याचे निष्पन्न झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×