गडचिरोली: शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भोवले; सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व रद्द: जिल्हाधिकारी यांनी केली कारवाई | बातमी एक्सप्रेस

Gadchiroli News,गडचिरोली,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,चामोर्शी,Latest Marathi News,Marathi News Updates,Marathi News,kurud,कु

Gadchiroli News,गडचिरोली,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,चामोर्शी,Latest Marathi News,Marathi News Updates,Marathi News,kurud,कुरूड,Chamorshi,
कुरूड: सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व रद्द - फोटो फाईल: पत्रिका

गडचिरोली
: चामोर्शी तालुका मधील वालसरा गट ग्रामपंचायत ने देखील ३ सदस्यांचे सदसत्व रद्द करण्याची कारवाई नुकतीच केली असतानाच पुन्हा कुरूड येथील ग्रामपंचायतिचे सरपंच व एका सदस्याचे रद्द करण्यात आल्याची कारवाई जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी केली आहे.

सविस्तर वृत्तांत: जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांच्याद्वारे कऱण्यात आलेली परत कारवाई हि शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने करण्यात आली असून शासकीय जागेवर अतिक्रमण करणे या दोघांना खरतरं चांगलेच भोवले आहे.

सदर कारवाईमुळे कुरूड ग्रामपंचायतीमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. विनोद मडावी (सरपंच) व वर्षा मुरकुटे ( ग्रामपंचायत सदस्या) अशी सदसत्व रद्द करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

चामोर्शी तालुक्यामधील रामपूर येथील कैलास धोडरे यांनी या संदभार्त १७ मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. दिलेल्या तक्रारीची तपास केला असता सदर जागेवर अतिक्रमण केले असल्याचे सिध्द झाले. यावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करत सरपंचासह ग्रामपंचायत सदस्याचे सदसत्व रद्द करीत असल्याचे काल ७ जुलै रोजी काढलेल्या आदेशात नमुद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.