गडचिरोली: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा घेण्याची अंतिम तारीख 15 जुलै असून जिल्हयातील शेतकऱ्यांनी विविध नैसर्गिक आपत्तींचा विचार करता पीक विमा घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला सांगितले. जिल्हास्तरीय पीक विमा बाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कर्जदार शेतकरी यांचा वीमा बँकेमार्फत शेतकऱ्यांची संमती घेवून काढला जात असतो. मात्र इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही पीक विमा घेण्यासाठी आवश्यक पीक विमा रक्कम भरून कोणत्याही आपले सेवा सरकार केंद्रावर पीक विमा काढता येणार आहे. याबात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठकीत सूचना केल्या. तसेच उर्वरीत कालावधीत गरजू शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी प्रशासन तसेच बँकांनी विशेष सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना त्यांनी केल्या. या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, एलडीएम युवराज टेंभुर्णे व इतर बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गडचिरोली: जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करता पीक विमा घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी दीपक सिंगला | बातमी एक्सप्रेस
गडचिरोली: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा घेण्याची अंतिम तारीख 15 जुलै असून जिल्हयातील शेतकऱ्यांनी विविध नैसर्गिक आपत्तींचा विचार करता पीक विमा घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला सांगितले. जिल्हास्तरीय पीक विमा बाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कर्जदार शेतकरी यांचा वीमा बँकेमार्फत शेतकऱ्यांची संमती घेवून काढला जात असतो. मात्र इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही पीक विमा घेण्यासाठी आवश्यक पीक विमा रक्कम भरून कोणत्याही आपले सेवा सरकार केंद्रावर पीक विमा काढता येणार आहे. याबात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठकीत सूचना केल्या. तसेच उर्वरीत कालावधीत गरजू शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी प्रशासन तसेच बँकांनी विशेष सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना त्यांनी केल्या. या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, एलडीएम युवराज टेंभुर्णे व इतर बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.