नंदुरबार: बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता | बातमी एक्सप्रेस

Nandurbar, Bolero car , Toranmal Sindigar road, kills 8, marathi updates, maharashtra, maharashtra news, marathi updtes, marathi news,

Nandurbar,  Bolero car , Toranmal Sindigar road, kills 8, marathi updates, maharashtra, maharashtra news, marathi updtes, marathi news,
नंदुरबार:बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात-फोटोफाईल:दिव्यमराठी 

नंदुरबार: 
नंदुरबार शहरातील तोरणमाळ सिंदिदिगर रस्त्यावर भीषण अपघातात तब्ब्ल आठ जणांचा मृत्यू झाला, प्रवासी वाहतूक करणारी बोलेरो गाडी जात असताना अचानक दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यू आकडा पुन्हा वाढू शकतो अशी माहिती समोर येत आहे. 

हेही वाचा: Chandrapur News: तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या

बोलेरो गाडी दरीत कोसळल्यामुळे बचाव आणि मदत कार्याला मोठा अडथळा येत आहे. यासाठी स्थानिकांची मदत सुद्धा घेतली जात आहे. भीषण अपघाताची माहिती मिळताच बघणाऱ्या नागरिकांची गर्दी देखील वाढली आहे. या ठिकाणी कुठल्याही कंपनीचा नेटवर्क नसल्याने माहिती आणि बचाव कार्यास मोठी  अडचण निर्माण होऊ लागली आहे. या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासन व गावकऱ्यांच्या साह्हायाने बचावकार्य  सुरु आहे. पोलीस अधिक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.