![]() |
Chandrapur News: तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या |
Chandrapur News: सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर या गावातील 32 वर्षीय युवकाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. युवकाने घरघुती भांडणातून गावालगतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहिती नुसार, नितीन रामकृष्ण पात्रे असे मृतकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतकाचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला असून पुढील चौकशी ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात ASI ठोके व नवरगाव चौकीचे पोलिस करीत आहे.