'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur News: पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा | बातमी एक्सप्रेस

0

Chandrapur News: पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,
Chandrapur News: पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

Chandrapur News:
 राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, खार जमीन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 19 जुलै 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

हेही वाचा: Chandrapur News: तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या

सोमवार दि. 19 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता एसीसी चांदा सिमेंट फॅक्टरी, सिमेंट नगर नकोडा येथे आगमन व कामगारांच्या समस्येबाबत अधिका-यांशी चर्चा, दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव, दुपारी 12.45 वाजता केपीसीएल अंतर्गत असलेली बराज खुली कोळसा खाण येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व कामागारांच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, दुपारी 1.30 वाजता अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापन व कंत्राटदारांची जिल्हाधिकारी कायालयात बैठक, दुपारी 2 वाजता कोव्हीड संभाव्य तिसरी लाट व लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा, दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.15 वाजता दुर्गापूर येथील लष्करे कुटुंबाची सांत्वनपर भेट, दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा, रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, उर्जानगर येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार दि. 20 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता हिराई विश्रामगृह येथे ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा, सायंकाळी 5 वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे प्रयाण.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×