Chandrapur Rain News: आठ दिवस दडी मारल्यानंतर आज दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं लोकांची त्रेधा उडाली. गेल्या आठ दिवसांपासून चंद्रपूरकर प्रचंड उकाडा सहन करीत होते. मात्र आज पावसानं हजेरी लावताच वातावरणात गारवा निर्माण झाला.
अचानक बरसलेल्या पावसामुळं लोकांनी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतला. पावसाअभावी जिल्ह्यात शेतीच्या कामांना अजूनही म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही.
हेही नक्की वाचा: चंद्रपूर जिल्हयात अल्पवयीन मुलीचा विवाह; आईसह पाच जणांवर गुन्हे दाखल
मृगाचा महिना आता लोटला असला तरी शेतीसाठी योग्य पाऊस पडलेला नाही. आज पडलेला पाऊसही पर्याप्त नाही. त्यामुळं शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट बघत आहेत
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.