Chandrapur Accident News: चंद्र्पुर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील मोहाळ महामार्गावर आज दुपारच्या सुमारास एका भ्ररधाव चारचाकी वाहनाने अज्ञात इसमाला रस्त्यातच चिरडल्याने इसमाचा मृत्यू झाला. राजकुमार नामदेव दोडके (34) रा. मोहाळी असे मृतकाचे नाव आहे.
मोबाईल प्रतिनिधीच्या माहिती नुसार: राजकुमार दोडके हे कान्पा वरून आपल्या दुचाकीवरून मोहाळीला प्रवास करत होते. अचानक त्याच वाटेत मृत्यू झाला. राजकुमार यांचं हे शेवटच प्रवास ठरलं.
या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच बचाव कार्य सुरू झाले. मात्र तो पर्यंत राजकुमारचा मृत्यूच झाला होता.
हेही नक्की वाचा: चंद्रपूर जिल्हयात अल्पवयीन मुलीचा विवाह; आईसह पाच जणांवर गुन्हे दाखल
या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत चारचाकी वाहन चालकांना ताब्यात घेतले आहे. मृतक राजकुमार याचे शव शवविच्छेदन करून कुटुंबाच्या सुपुर्द केले. मृतक राजकुमारच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे. पुढील तपास नागभिड पोलीस करित आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.