सोलापूर- विजयपूर महामार्गावर लावणार स्थानिक, देशी प्रजातीची झाडे जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण

Be
0

सोलापूर- विजयपूर महामार्गावर लावणार स्थानिक,सोलापूर,विजयपूर,Solapur,वृक्षारोपण

सोलापूर
: सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील 52 बायपास याठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले. या महामार्गाच्या दुतर्फा देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

सोलापूर-विजयपूर 110 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाच्या दुतर्फा लिंब, पिंपळ, चिंच, पांगिरा, वड, शिरीष बकुळ, जांभूळ आदी झाडे लावणार आहेत. या महामार्गावरील कामकाजात 18 तासात 25 किलोमीटरचे डांबरीकरण करण्यात आले होते. या झाडांची देखभाल पुढील 20 वर्षे आयजीएम कंपनीमार्फत केले जाणार असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हाधिकारी अरूणा गायकवाड, अप्पासाहेब समिंदर, मिलिंद वाबळे, क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, रवींद्र पाटील, आयजीएम कंपनीचे महाव्यवस्थापक सिद्धनगौडा, तांत्रिक व्यवस्थापक व्यंकटेश, सोमलिंगाप्पा येड्डे, अनिल विपत आदी उपस्थित होते.
कंपनीने विजयपूर महामार्गावर यापूर्वी 3347 झाडांचे पुनर्रोपण केले आहे. त्यापैकी 90 टक्के झाडांची उत्तम वाढ झाली आहे, असेही श्री. सिद्धनगौडा यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->