Chandrapur Crime News: चंद्रपूर जिल्हयात अल्पवयीन मुलीचा विवाह; आईसह पाच जणांवर गुन्हे दाखल | बातमी एक्सप्रेस

चंद्रपूर जिल्हयात अल्पवयीन मुलीचा विवाह,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur,Chandrapur Crime Live,Chandrapur Live,

Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur,Chandrapur Crime Live,Chandrapur Live,Crime,Chandrapur Crime News

Chandrapur Crime News:
चंद्रपुर जिल्ह्यामधील भद्रावती शहरातील फक्त 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह आईने इतर 4 जणांशी संगनमत करून केल्याची खबळजनक घटना भद्रावती शहरात उघडकीस आली. अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून आईसह पाच जणांवर भद्रावती पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. यातील चार जणांना अटक करण्यात यश आले असून तर मुलीची आई फरार आहे.

सविता अवसारे वय (49) , बसंती तांडे वय (44), विक्रम अंजीरवार वय (25), अरविंद मालवीय वय (27) अशी आरोपींची नावे आहेत. यातील मुलीची आई संगीता ही फरार आहे. भद्रावती पुलिसांकडून तपास सुरूच आहे. 

मध्यप्रदेशातील राजापूर येथे दोन आरोपीच्या संगनमताने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे विवाह 21 एप्रिल ला करून दिला. मुलीच्या मोठ्या बहिणीला या घटनेची माहिती मिळताच तिने भद्रावती पोलिसांकडे तक्रार केली.  

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भद्रावतीचे ठाणेदार यांनी विशेष पथक तयार केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी या घटनेचा पूर्ण तपास करून या घटनेतील आरोपींना मध्यप्रदेश तसेच भद्रावतीतुन अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.