Chandrapur News: उर्जामंत्र्यांनी घेतला वीज उत्पादन विषयक कामांचा आढावा | बातमी एक्सप्रेस

उर्जामंत्र्यांनी घेतला वीज उत्पादन विषयक कामांचा आढावा,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,

उर्जामंत्र्यांनी घेतला वीज उत्पादन विषयक कामांचा आढावा,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News:
 येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रातील राखेने भरलेल्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज उत्पादन विषयक कामांचा आढावा घेतला. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, महानिर्मितीचे संचालक(खणिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक(पर्यावरण व सुरक्षितता) डॉ.नितीन वाघ, मुख्य अभियंते पंकज सपाटे, श्री.देशपांडे, श्री. वाळके आदी उपस्थित होते.

हेही वाचा:  Chandrapur News: चंद्रपुरात शेतकरी आत्महत्यांचा वीस वर्षातील उच्चांक

यावेळी बोलतांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, इरई नदीवरील सौर उर्जा प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प वेगाने कार्यान्वित होण्यासाठी पूर्णवेळ अधिक्षक अभियंत्याची तात्काळ नेमणूक करा. दर आठवड्याला तांत्रिक कामांचा आढावा कसोशीने होणे गरजेचे आहे. तसेच औष्णिक विद्युत केंद्रात संशोधन विकास विभाग सुरू करावा. तांत्रिक घटनांचे विश्लेषण, डाटाबँक विकसित करावी. रोबो आणि आर्टिफिशियल इंटिलीजन्स प्रणालीचा वापर करून अत्याधुनिक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. जेणेकरून अशा संशोधनामधून आणि केस स्टडीमधून कंपनीची प्रगती होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
ऊर्जामंत्र्यांना विद्युत केंद्राची माहिती देतांना मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी सांगितले की, मागील काही महिन्यात अनेक बाबींमध्ये प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत झाली व वीज उत्पादनाची कार्यक्षमता वाढली. रस्ता मार्गे वाहतूक होणाऱ्या कोळशामुळे प्रदुषणाची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी कोळसा वाहून नेणा-या पाईप कन्व्हेयरचे काम पूर्णत्वास आले असून ऑगस्ट 2021 मध्ये या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ नियोजित आहे, असे ते म्हणाले.
बैठकीला औष्णिक विद्युत केंद्रातील विविध विभागाचे अधिकारी, अभियंते आदी उपस्थित होते. आढावा बैठकीपूर्वी ऊर्जामंत्री यांनी 500 मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक 8 व 9 च्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि अभियंत्यांशी संवाद साधला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.