Chandrapur News घुग्घुस: गेल्या 1 एप्रिल 2015 रोजी जिल्यामध्ये दारू विक्रीला विराम लागलेला होता. त्यामुळे अनेक बार मालक तेथील कामगार वर्ग आणि दारू पिणारा व्यक्ती खूप नाराजीत होता. या दारू बंदी नंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले, आणि महाविकास आघाडीने दारू बंदी उठण्याचा निर्णय घेतला. जिल्यात पूर्णपने बंद असलेल्या दारू विक्रीला पुन्हा एकदा चालना मिळाली असून, दारू विक्रीला सुरुवात झाली आहे.
यामुळे बार चालक मालकाला अतिशय आनंद झाला आहे. या क्षणाचा आनंद व्यक्त करण्यासाठी बार मालकाने कोरोनाचा नियमाचा सुद्धा उल्लंघण केला आहे. फटाक्यांची आतिशबाजी करत मोठी गर्दी जमवली आहे. हे दृश्य चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस या शहरात पाहायला मिळाले. जेणेकरून अश्या बार चालकांवर तात्काळ कारवाई करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.