Nagpur News: ब्लॅक फंगस विळख्याचे तांडव थांबेना, नव्याने चौघांना लागण , आणखी एकाचा मृत्यू | बातमी एक्सप्रेस

Nagpur,Nagpur News,marathi updates, maharashtra, maharashtra news, marathi updtes, marathi news, Nagpur News ब्लॅक फंगस,

Nagpur,Nagpur News,marathi updates, maharashtra, maharashtra news, marathi updtes, marathi news, Nagpur News ब्लॅक फंगस,
Nagpur News: ब्लॅक फंगस विळख्याचे तांडव थांबेना, नव्याने चौघांना लागण

Nagpur News:
 कोरोनाची तिसरी लाट दारात उभी असल्याचे भाकित वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मांडत आहेत. मात्र तुर्तास दुसऱ्या लाटेतून मुक्ती अनुभवणाऱ्या नागपूर जिल्ह्यात कोव्हिडपश्चात उद्भवलेल्या ब्लॅक फंगसचे तांडव काही कमी व्हायला तयार नाही. 

कोरोनावर मात करीत असताना झालेल्या उपचारात स्टिरॉईडची मात्रा सहन न झाल्याने मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेल्यांना या बुरशीचा विळखा वाढत आहे. सोमवारी यात जिल्ह्यातून आणखी 4 नव्या रुग्णांना या बुरशीने गाठल्याचे निदान करण्यात आले. 

हेही वाचा: Chandrapur News: तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या

त्यामुळे एकट्या नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनापश्चात या बुरशीजन्य आजाराचा विळखा पडलेल्यांची संख्या 1692 पर्यंत पुढे सरकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपचारादरम्यान सोमवारी आणखी एका ब्लॅकफंगसग्रस्ताचा मृत्यू ओढवला. त्यामुळे ब्लॅक फंगस बळी संख्याही वाढून 169 पर्यंत धडकली. 

नागपूरसोबतच आतापर्यंत विभागातील वर्धा जिल्ह्यात 135, चंद्रपुरात 112, गोंदियात 48 तर भंडारा जिल्ह्यात 19 जणांना या बुरशीने गाठले. त्यातील गोंदिया जिल्ह्यात 9 तर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी 5 मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.