![]() |
जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली |
खेड तालुक्यातील जनजीवन जरा कुठे मार्गस्थ होत असतानाच पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. गेले तीन दिवस संततधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांशी भातशेती पाण्याखाली गेली आहे.
हेही वाचा: Chandrapur News: तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या
संततधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणार्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्याच्या पाण्याची पातळीही कमालीची वाढली आहे. या दोन्ही नद्याचे पाणी कधीही शहरात शिरण्याची शक्यता असल्याने व्यापारी आणि नागरिकांनी सतर्क रहावे असा सावधानतेचा इशारा नगर पालिका प्रशासनाने दिला आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या दोन्ही नद्यांचे पाणी कधीही शहरात घुसण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.