कुरखेडा तालुक्यातील मौजा सोनसरी येथील कोहरे लाईन मॅन या ठिकाणी राहत नाही त्यामुळे सोनसरी येथिल लाईन हि सकाळी-संध्याकाळी पण ये-जा करीत असते. सोनसरी येथील नागरिकांना पुरेशा प्रमाणात लाईन मिळत नाही आहे पण लाईन मॅन कोहरे हे कुरखेडा शहरात राहून ते तिथूनच डमरू वाजवत असतात.
अशी सोनसरी येथील नागरिकांची तक्रार नेहमीच असल्याने त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, व लाईन मॅन ड्युटी पण बरोबर करीत नाही. सोनसरी या गावात नेहमी हजर राहत नाही. नेहमीच कवरेज बाहेर असतात. लाईन मॅन यांची हकालपट्टी तात्काळ करावी असी गावातील नागरिकांची मागणी जोर धरत आहे.