'
30 seconds remaining
Skip Ad >

लाखांदूर - विरली बु: विद्युत स्पर्शाने गाय जागीच ठार

0

लाखांदूर - विरली बु: विद्युत स्पर्शाने गाय जागीच ठार

लाखांदूर - विरली बु: पावसामुळे विद्युत प्रवाह प्रवाहित झालेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने गाय ठार | झाल्याची घटना बुधवार दि. १६ जुन रोजी ५ वाजेच्या सुमारास घडली. ही गाय प्रमोद बकाराम कोरे यांच्या मालकीची असून जोड धंदा म्हणून प्रमोद यांनी २ ते ३ महिन्यापूर्वी ५५ हजार रुपयांची गाय खरेदी केली होती. येथील कालव्याच्या पाळीवरील गावातील इतर पशुपालकास सोबत कोरे यांनीही आपली गुरेढोरे चारण्यासाठी सोडली होती.

या दरम्यान आलेल्या जोरदार पावसाने कालव्याच्या पाळीवर विद्युत खांबावर वीजप्रवाह प्रवाहित झाला. सदर गाय या खांबाजवळ तिचा खांबाला स्पर्श झाल्यामुळे विजेच्या धक्वयाने गाय खांबाला चीपकून जागीच ठार झाली. 

प्रमोद कोरे यांच्या सहकार्याने घटनेची माहिती पीडित पशूपालन प्रमोद यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी गाठले. याविषयी महावितरण शाखेचे अभियंता व स्थानिक तलाठी यांना घटनेची माहिती दिली आली. विहिरीच्या महावितरण शाखेचे अभियंता व येथील कोतवाल यांनी घटनास्थळी पोचून घटनेचा पंचनामा केला. घटनेची माहिती लाखांदूर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. परी प्रमोद कोरे यांचे आर्थिक नुकसान भरपाई देण्याची विरली बु. येथील गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×