Education News: राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या...

Education,Education News,India News,News India,Mumbai,Mumbai News,

Education,Education News,India News,News India,Mumbai,Mumbai News,

Education News:
 राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी महत्वाची माहिती दिली आहे. पुढील 15 ते 20 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात मागील काही दिवसांत कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला होता. कोरोनाची परिस्थिती काहीशी निवळल्याने सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते.

याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत.

दरम्यान, राज्यात शाळा सुरु होणार की नाही? याबाबत संभ्रम होता. आता विद्यार्थ्यांमधील हा संभ्रम दूर होणार असल्याचे दिसून येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.