औरंगाबाद: शहरात 18 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Aurangabad,suicide,suicide news,Suicide Marathi News,आत्महत्या,गळफास,

Aurangabad,suicide,suicide news,Suicide Marathi News,आत्महत्या,गळफास,

औरंगाबाद
शहरातील मोहन टॉकीज जवळील आपल्या राहत्या घरीच तरुणीने रविवारी (२७ जुन) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास किचनमध्ये ओढाणीच्या साहाय्याने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 

गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव ईशा राजेश तंगडपल्ली (वय 18 रा. विठ्ठल मेंदी शेजारी सराफ रोड मुलमची बाजार) असे आहे. 

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे वडील सलून दुकानात कामाला जात असून आई कपड्याच्या दुकानात जाऊन काम करत असतात. 

सविस्तर माहिती नुसार, ईशाचे आई-वडील रविवारला आपल्या कामावर गेल्यानंतर बारा वाजेच्या सुमारास घरामध्ये आज्जी आणि लहान भाऊ असताना, इशाने राहत्या घरामधील किचन मध्ये जाऊन गळफास लावून घेतला होता.

दरम्यान, ही बाब लहान भावाच्या लक्षात येताच त्याने शेजाऱ्यांना बोलावून ईशाला घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ईशाला तपासून मृत घोषित केले. 


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.