Jalna News: जालन्यात रेल्वेखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू

Jalna News: जालन्यात रेल्वेखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू,Jalna News,Jalna,Accident,Accident News,अपघात,रेल्वे अपघात,

Accident,Accident News,रेल्वे अपघात,Jalna News,Jalna,अपघात,

Jalna News:
 गेल्या काही दिवसापासून जालना शहर आणि परिसरात रेल्वेखाली येऊन नागरिकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी एकाच दिवशी दोन जणांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुक्तेश्वर तलाव परिसरात रेल्वे पटरीवर एका व्यक्तीचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला आहे. 

विशेष म्हणजे अपघातानंतर दोन तासानंतर ही रेल्वे पोलीस अपघात स्थळकडे न फिरकल्याने त्या मृतदेहावरून इतर दोन गाड्या देखील गेल्याचे पाहायला मिळाले. 

अद्याप मयत व्यक्तीची ओळख पटली नसून सध्या रेल्वे पोलीस त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करीत आहेत. 

या व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली की अपघाताने रेल्वेखाली येऊन व्यक्तीचा मृत्यू झाला याबाबतही अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.