Nagpur Corona: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मिठी सैल होत असताना डेल्टा प्लसया नव्या व्हेरियंटची सर्वांनाच धास्ती लागली आहे. त्यामुळे राज्य सरकार नव्याने निर्बंध लावण्याच्या तयारीत असताना नागपूरला मात्र रविवारी दिलासा मिळाला.
जिल्ह्यात आज एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू ओढवला नाही. समाधानाची आणखी एक बाब म्हणजे तपासलेल्या एकूण संशयित नमुन्यांमधून नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्यांची सरासरीही अर्धा टक्क्याच्या खाली घसरली.
तर दुसऱ्या बाजूला आज दिवसभरात 69 संक्रमित रुग्ण उपचाराने बरे झाले. त्यामुळे आता जिल्ह्यात केवळ 426 अॅक्टिव्ह बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
- पॉझिटिव्ह- 22
- आजचे आजारमुक्त- 69
- एकूण चाचण्या- 8538
- आजचे मृत्यू- 00
- अॅक्टिव्ह बाधित- 426
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.