Gadchiroli Live: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त गडचिरोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली शहरातील फुले वार्ड येथील 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले. Read Also: Bhandara Live: भंडारा जिल्ह्यात वैनगंगा कोविड सेंटर सुरू, जाणून घ्या?
निःशुल्क रक्तसेवा समिती कुरुड (कोंढाळा) च्या वतीने सुद्धा 19 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. जिल्हा स्वयं रक्तदाता समिती गडचिरोली व रांगी ग्रामस्थ यांच्या वतीने 18 जणांनी रक्तदान केले. Read Also: Bhandara Live: पिंडकेपार येथे भीषण पाणीटंचाई; प्रशासनाचे दुर्लक्ष !
जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने 14 युवकांनी रक्तदान केले. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रक्तपेढीत रक्ताची कमतरता जाणवत होती. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढीत असलेली कमतरता एकाचवेळी 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून भरून काढली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.