Chandrapur Corona News: चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा व त्यामुळे निर्माण झालेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्यांचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना तातडीने भेटून चंद्रपूर जिल्हयात तातडीने रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला यश आले असून आज रात्री किंवा उघा पर्यंत चंद्रपूर जिल्हयात रेमडेसिव्हिर इंजेक्शन साठा उपलब्ध होणार आहे. यावेळेस राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पशुसंवर्धन व क्रिडा मंत्री सुनिल केदार उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर या इंजेक्शनचा चंद्रपूर:
जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्रात तुटवडा निर्माण झाला होता. चंद्रपूर जिल्हयात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडयामूळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकाकडून फोन येवू लागताच जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेटटीवार हे सोमवारला तातडीने चंद्रपूर येथील संबधित अधिका-यांची आॅनलाइन बैठक घेतली. आवश्यक असेल त्या रुग्णाला रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार होणार नाही याकडे विशेष लक्ष देवून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करणा-या विरुध कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. Read Also: CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली
$ads={1}
रुग्ण रेमडेसिव्हिर इंजेक्शनपासून वंचित राहणार नाही:
चंद्रपूर जिल्हयातील कोणताही रुग्ण रेमडेसिव्हिर इंजेक्शनपासून वंचित राहणार नाही या करिता विजय वडेट्टीवार यांनी आज तातडीने मुंबई गाठून अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली. चंद्रपूर जिल्हयातील सर्व परिस्थितीची माहिती देवून जिल्हयात मोठया प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली.
उघापर्यंत रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध:
त्यावेळेस राजेंद्र शिंगणे यांनी चंद्रपूर जिल्हयासाठी कोणताही भेदभाव न करता आज किंवा उघापर्यंत रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करुन देणार असल्याचे वडेट्टीवार यांना सांगितले. त्यामुळे विजय वडेटटीवार यांच्या मागणीला यश आले असून आज रात्री किंवा उघा सकाळ पर्यत चंद्रपूर जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणार आहे. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली
विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटले ?
याबाबत विजय वडेट्टीवार यांनी माहिती देतांना म्हटले की, चंद्रपूर जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिंवसेंदिवस वाढत असल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडयाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी आज अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेवून चंद्रपूर जिल्हयातील परिस्थितीची माहिती देवून रेमडेसिव्हिर इंजेक्शन मोठया प्रमाणात उपलब्ध करुन दयावे अशी मागणी केली त्यांनी आज किंवा उघा सकाळपर्यत तातडीने रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करुन देणार असे सांगून संबधित अधिका-यांना याबाबत निर्देश दिले त्यामुळे चंद्रपूर जिल्हयात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणार असल्याचे सांगून राज्य शासनाने करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या कडक लॉकडाऊनला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.