'
30 seconds remaining
Skip Ad >

CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली | Batmi Express Marathi

0

CBSE Board Exam 2021,Cbse exam,cbse exam news, cbse exam new date, cbse exam 10th 2021, cbse exam latest news, cbse 10th exam cancel, cbse 12 exam postponed,cbse exam postponed news, education minister cbse exam postponed, cbse exam update,cbse exam cancel by education minister, cbse exam 10th 12th postponed, cbse latest exam news
Img File- Zeebiz

CBSE Board Exam 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज १४ एप्रिलला दुपारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल शिक्षण सचिव आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली या बैठकीत सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या,  तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

$ads={1}

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी CBSE च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे.  Read Also: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली 

त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे.केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर CBSE परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. 

$ads={2}

मात्र, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. 

दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता 1 जून रोजी CBSE कडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×