Maharashtra Board Exams 2021: संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.
Read Also: नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण$ads={1}
पहा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री ?
तसे दहावी बारावीच्या - परीक्षाबाबत आणखी काही अपडेट आले, तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू - दरम्यान आज १२ एप्रिल ला झालेल्या निर्णयानुसार ,राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.
$ads={2}
Maharashtra Board Exams: यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच खल झाला. सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला.
अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.