Chandrapur Corona Total Cases :
सध्या 5888 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 4 हजार 498 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 65 हजार 135 नमुने निगेटीव्ह आले आहेत. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली
Chandrapur Corona Death Today: : 10 ।
आज मृत झालेल्यामध्ये आंबेनेरी ता. चिमूर येथील 56 वर्षीय पुरुष, सोनेगाव बु. ता. चिमूर येथील 65 वर्षीय महिला, पिपर्डा ता. चिमूर येथील 50 वर्षीय महिला, चंद्रपूर शहराच्या सरकारनगर येथील 38 वर्षीय महिला, भिवापूर बंगाली कॉलनी येथील 58 वर्षीय महिला व जटपुरा गेट येथील 62 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील 45 वर्षीय पुरुष, गुरुमाऊली नगर वरोरा येथील 70 वर्षीय महिला, सलीमनगर, वरोरा येथील 63 वर्षीय पुरुष, बल्लारशा येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
$ads={2}
Chandrapur Corona Cases Today:
आज बाधीत आलेल्या 974 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 309, चंद्रपूर तालुका 58, बल्लारपूर 10, भद्रावती 108, ब्रम्हपुरी 16, नागभिड 26, सिंदेवाही सहा, मूल 21, सावली 14, गोंडपिपरी 10, राजूरा 15, चिमूर 142, वरोरा 205, कोरपना 26 व इतर ठिकाणच्या आठ रुग्णांचा समावेश आहे. Read Also: नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. Read Also: तीन लग्नांचे वऱ्हाड पोहचले पोलीस ठाण्यात ! पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.