पहा कशी आहे नियमावली ?
● महाराष्ट्रात 14 एप्रिल रात्री 8 वाजेपासून राज्यात कलम 144 लागू होणार - सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार ,तसेच लोकल ट्रेन आणि बस सेवा सुरू राहणार.
● रिक्षात-ड्रायव्हर आणि 2 प्रवासी , तसे टॅक्सी मध्ये ड्रायव्हर आणि 50 टक्के क्षमतेने वाहतूक होणार - मात्र खासगी वाहतूक केवळ आणीबाणीच्या काळात सेवा देऊ शकतात.
● राज्यातील रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स सेवा बंद असतील, त्यांना केवळ घरपोच पार्सल सेवा देण्याची मुभा असेल - तर ही सेवा सकाळी ७ ते संध्याकाळी ८ या वेळेत मिळणार.
● तसेच रस्त्यालगतचे सर्व खाद्यपदार्थांची दुकाने बंद राहतील. - पाणीपुरवठा, शेतीचे कामे करण्यास मुभा देण्यात आली आहे - इलेक्ट्रिक वस्तू, गॅस पुरवठा, एटीएम सेवा ,बँकिंग सेवा सुरु राहील .
● राज्यात मेडिकल, किराणा दुकाने सुरू राहणार - मात्र असे दुकाने , मॉल, शॉपिंग सेंटर्स जे अत्यावश्यक सुविधांमध्ये मोडत नाहीत - ते बंद राहतील.
● धान्याची दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दूध, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारचे खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहतील - मात्र राज्यातील ब्युटी पार्लर्स , सलून सिनेमागृह , बगीचे आणि व्यायामशाळा बंद राहतील.
● तसेच राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं तसेच सर्व प्रकारचे खाजगी क्लासेस बंद राहतील - सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे सुद्धा बंदच राहतील -औद्याेगिक क्षेत्रातील उद्याेग धंदे सुरू राहतील.
● तसेच जिथे कामगार राहत असतील केवळ ,अशाच ठिकाणची बांधकामे सुरू राहतील - राज्यात लग्नाला आता केवळ 25 जणांना तर अंत्यविधीला केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
● दरम्यान राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेमध्ये बदल करून - आणखी काही घटकांचा समावेश केला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.