तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Yavatmal Corona Outbreak: 13 मृत्युसह जिल्ह्यात 588 नव्याने पॉझेटिव्ह; 453 जण कोरोनामुक्त | Batmi Express Marathi

Yavatmal Corona Outbreak: गत 24 तासात 13 मृत्युसह जिल्ह्यात 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

Yavatmal Corona News,Corona News in yavatmal,yavatmal hindi news,yavatmal latest news,yavatmal ki news,yavatmal korona news

Yavatmal Corona Outbreak: गत 24 तासात 13 मृत्युसह जिल्ह्यात 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 453 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. Read Also: Maharashtra Board Exams 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी 2021 ची परीक्षा पुढे ढकलली

$ads={1}

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 58, 48, 45, 80, 54, 70 वर्षीय पुरुष व 53 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 52 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 32 व 71 वर्षीय महिला, नेर शहरातील 55 वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 588 जणांमध्ये 360 पुरुष आणि 228 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 193 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 51, पांढरकवडा 49, पुसद 45, वणी 43, कळंब 39, दारव्हा 38, महागाव 37, नेर 23, मारेगाव 19, बाभुळगाव 17, उमरखेड 12, आर्णि 11, घाटंजी 8 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

सोमवारी एकूण 4034 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3446 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3307 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2094 तर गृह विलगीकरणात 1213 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34638 झाली आहे.
$ads={2}
24 तासात 453 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 30572 आहे. Read Also: राज्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन ! लावावा लागणार - मुख्यमंत्री

जिल्ह्यात एकूण 759 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.73 असून मृत्युदर 2.19 आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 315637 नमुने पाठविले असून यापैकी 313588 प्राप्त तर 2049 अप्राप्त आहेत. तसेच 278950 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.